ग्रामस्थांनी एकजुटीने जलसंधारणाचे शिवधनुष्य पेलले – क्रांती बोराटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक दि. २ (रणजित लेंभे) : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार वाढल्याने जागतिक संकट ओढवले असताना आसनगाव ग्रामस्थानी एकजुटीने जलसंधारणाचे शिवधनुष्य उचलला. असे गौरवोद्गार कोरेगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी काढले.

आसनगाव (शहापूर) ता. कोरेगाव येथील पाझर तलावाच्या कामाची पाहणी करून परिसरात वृक्ष लागवडीचे नियोजन करीत असताना ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी लघु पाट बंधारे विभागाचे उपअभियंता पांढरे, ग्राम विकास अधिकारी गणपत खलाटे, संभाजी शिंदे, अनिल शिंदे, प्रभाकर शिंदे, शामराव गुरव, विरसिंग शिंदे, प्रदीप शिंदे, स्वप्नील शिंदे उपस्थित होते.

बोराटे म्हणाल्या, ग्रामस्थांनी मागील काही वर्ष जलसंधारण व मृदासंधारणचे काम केले. काबाड कष्ट करून घाम गाळून जे पाणी निर्माण केले. त्याचा जर योग्य वापर जर केला नाही तर भविष्यात पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल त्यासाठी पाणी व्यवस्थापन व पाणी बचत ही काळाची गरज आहे. पाणी बँक जर रिकामी झाली तर आपल्याला सहजपणे ती भरता येणार नाही म्हणूनच पाणी व्यवस्थापन मधील एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे पाऊस मोजणे नकी आपल्या गावात किती पाऊस पडला. त्यानुसार आपल्या सर्वांना एकत्र बसून त्याचे नियोजन  करावा लागेल जर कोणीही कस ही पाणी उपसा करू लागला, तर दुष्काळा सारखे संकट येईल ते परत नको असेल तर, यासाठी पाणी व्यवस्थापण केलंच पाहिजे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!