येत्या ‘अरुण पर्व,’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

सुप्रसिद्ध गायिका विदुषी सौ.मंजुषा पाटील यांचे गायन


स्थैर्य, 3 जानेवारी, सातारा : येथील श्री समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे येत्या रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुप्रसिद्ध गायिका विदुषी-सौ.मंजुषा पाटील यांचे सुश्राव्य गायन संपन्न होणार आहे.या कार्यक्रमांमध्येच सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठ कर सल्लागार आणि चित्रपट निर्माते ,लेखक, मार्गदर्शक स्वर्गीय अरुणराव गोडबोले यांना आदरांजली अर्पण करताना समाजातील विविध घटकातील लोकांनी व्यक्त केलेल्या शब्दरूपी भावनांचे संकलन .. अरुण पर्व .. या पुस्तकातून करण्यात आलेले आहे .या अरुण पर्व.. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा. श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांचे वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या पुस्तकाचे संपादक म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांनी काम पाहिले असून या सोहळ्यास सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक डॉ.अच्युत गोडबोले यांनी केले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर विदुषी-सौ.मंजुषा पाटील यांचे उर्वरित गायन होणार असून त्यांना संवादिनीवर साथ स्वरूप दिवाण, तबलासाथ रोहित मुजुमदार व टाळावर साथ आनंद टाकळकर करणार आहेत.या कार्यक्रमासाठी सातारा येथील रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट हे सह प्रायोजक म्हणून लाभले आहेत.


Back to top button
Don`t copy text!