ट्रॅक्टर ट्रॉलीस दुचाकी धडकून युवक ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | म्हसवड | पाठीमागील बाजुस रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅलीमुळे एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला. सातारा पंढरपुर रोडवर पळशी फाट्याजवळ काल रात्री पावणे आठच्या सुमारास कृष्णा जालिदर शेळके वय २८ हे दुचाकी (एमएच ११बी५-१६४६) वरुन जात असताना रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅलीवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले. अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर ड्रायव्हर फरार झाला असुन त्याचा तपास सुरु आहे

याबाबत म्हसवड पोलिस ठाण्याकडुन मिळालेली माहिती अशी काल रविवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजून ५५ मिनिटानी सातारा पंढरपुर रोडवरील पळशी फाट्या नजीक असलेल्या वाण्याच्या झाडीच्या रस्त्यावर नंबर नसलेला लाल रंगाचा महेंद्र कंपनीचा ट्रॅक्टर व त्याला दोन ऊसाने भरलेल्या ट्रॉली होत्या. पाठीमागील बाजूला रिफ्लेक्टर नसताना ट्रॅक्टर ड्रायव्हरने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन हायगयीने व हालगर्जीपणाने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर रस्त्याच्या मध्यभागी उभा केला होता. पाठीमागून म्हसवडवरुन आपल्या घरी शेळकेवाडीकडे प्लेन्डर पर्ल्स या दुचाकीवरुन निघालेल्या कृष्णा जालिदर शेळके वय २८ यास रिफ्लेक्टर नसल्याने ट्रॉली न दिसल्याने त्यावर जाऊन आदळल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. याबाबत फरारी ट्रॅक्टर ड्रायव्हर विरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद मयत कृष्णा शेळके यांचा भाऊ नितीन जालिदर शेळके यांनी दिली असुन पोलिस हवालदार व्ही. आर. अभंग करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!