माता रमाईंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिवादन


स्थैर्य, मुंबई, दि. 27 : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांची ‘सावली’, वंचित बांधवांची ‘माऊली’ माता रमाईंच्या स्मृतीदिनानिमित्तं विनम्र अभिवादन. माता रमाई म्हणजे दिनदुबळ्यांची आई, त्यागाची मूर्ती, माता रमाईंनी प्रचंड कष्ट, गरीबीचे चटके सहन करत डॉ. बाबासाहेबांना समर्थ साथ दिली. डॉ. बाबासाहेबांच्या महामानवापर्यंतच्या प्रवासातील त्या प्रमुख साथीदार बनल्या. माता रमाई नसत्या तर कदाचित डॉ. बाबासाहेब घडले नसते. डॉ. बाबासाहेबांना महामानव पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या आमच्या माता रमाईंना त्रिवार वंदन.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!