पसरणी घाटामध्ये बर्निग कार चा थरार; पनवेलचे भाऊ बहिण प्रसंगावधानामुळे सुरक्षित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ एप्रिल २०२२ । वाई । वाई येथील पसरणी घाटात भर दुपारी बर्निंग प्रवास्यांना कारचा थरार पाहायला मिळाला. पनवेल येथील रहिवासी असलेले ओंकार बसवत व सुजीता बसवत हे बहीण-भाऊ टाटा टिग्योर कारमधून महाबळेश्वरला फिरण्यासाठी जात असताना गुरुवारी १४ रोजी दुपारी पसरणी घाटात धावत्या कारने अचानक पेट घेतला. दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. त्यांनतर त्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पॉवेल येथील रहिवासी असलेले ओंकार कृष्णा बसवत (वय ४०) आणि त्यांची बहिण सुजीता कृष्णा बसवत हे आज गुरुवारी त्यांच्या टाटा टिगर कारमधून (एमएच ०१ डीपी ०८५१) महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पसरणी घाट चढताना दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागल्याचे कारचालक ओंकार बसवत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ कार घाटरस्याच्या कडेला ऊभी करुन कारचेबोनेट ऊघडले असता कारने अचानक पेट घेतला. बघता-बघता आगीने उग्ररुप धारण केले. आणि क्षणार्धात कार जळून खाक झाली.

या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे व पाचगणी पोलिस ठाण्याचे पिएसआय यशवंत महामुलकर आणि सहाय्यक फौजदार अरविंद माने यांना समजताच त्यांनी वाई आणि पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. त्यानंतर पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक पथकाने घटनास्थळी धाव घेत कारला लागलेली आग विझवली. दरम्यान, पसरणी घाटात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.


Back to top button
Don`t copy text!