सोनगावमध्ये मार्गदर्शन कार्यशाळेचा तिसरा दिवस महिला आधिकारींच्या प्रेरणादायी विचारांनी संपन्न


दैनिक स्थैर्य । 08 मे 2025। फलटण । डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, सोनगाव यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित त्रिदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचा तिसरा दिवस अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या दिवशी विशेष मार्गदर्शक म्हणून फलटण शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षिका विजयमाला गाजरे व अयोध्या घोरपडे या दोन महिला अधिकारी उपस्थित होत्या.

आपल्या अभ्यासू, समर्पित आणि प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून, कठीण परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवता येते, याचा ठाम संदेश त्यांनी दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं की, “पूर्ण क्षमतेने प्रयत्न करा, निष्ठावान राहा, आणि संधीचा योग्य लाभ घ्या.”

या वेळी त्यांनी अभ्यासिकेचे मनःपूर्वक कौतुक करत, “सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एवढं उत्कृष्ट व्यासपीठ मिळणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे,” असे उद्गार काढले.

यावेळी फलटण पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल व सोनगावचे सुपुत्र दत्तात्रय लवटे साहेब यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनगाव गावच्या आदर्श सरपंच सौ. राणीताई संतोष गोरवे या होत्या. त्यांनी ग्रामपातळीवर अभ्यासिकेच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. राजेश निकाळजे यांनी केले.

प्रास्ताविक पोपटराव बुरुंगले, तर आभार प्रदर्शन यश बापूराव नामदास यांनी केले.

कार्यक्रमास सोनगाव विकास सोसायटीचे चेअरमन संदीप पिंगळे, पोलीस पाटील दीपक लोंढे, रामहरी पिंगळे, दत्तात्रय ननावरे, भगवान जगदाळे, अतुल लोंढे, संतोष गोरवे, कांतीलाल चव्हाण, गणेश कांबळे, रमेश मदने, गणेश नामदास, अविनाश गोरे, नामदेव शिंदे, लखन पिंगळे, संतोष आडके, रमेश वाघ, मनोज लोंढे, सुधीर ओव्हाळ, प्रतीक लोंढे, सागर पाटोळे, सुनिल रिटे, अनिल रिटे, ज्ञानदेव शेंडे, राजेंद्र लोंढे, अमोल सस्ते, तेजस बेलदार, कानिफनाथ वाघ, नानासो धायगुडे सर, नितीन बनसोडे सर, महेश जाधव, स्वप्निल वाघ, संजय वाघ यांसह पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक उन्नतीसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरली, आणि ग्रामीण भागात नव्या आशा व संधीचा प्रकाश घेऊन आली.


Back to top button
Don`t copy text!