स्थैर्य, सातारा, दि.२३: एमआयडीसी, सातारा येथे सूटकेस चौकात पार्क केलेली 10 हजार किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली.
याबाबत माहिती अशी, शशिकांत लक्ष्मण घोरपडे रा. कारंडवाडी, ता. सातारा यांच्या भावाच्या नावावर टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल (एमएच 11 एन 6466) आहे. शशिकांत घोरपडे हे दि. 16 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास कामावरून घरी येत होते. यावेळी एमआयडीसीतील कृष्णा हॉटेलच्या समोर त्यांनी मोटारसायकल पार्क केली व आजबाजूच्या परिसरात तंबाखूची पुडी आणण्याकरिता गेले. काही वेळात ते परत आले असता त्यांची दुचाकी चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी घोरपडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.