दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । सातारा । भुईंज पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघड करून चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत करण्यासह चोरट्यास जेरबंद केले आहे. अमोल मोहन जाधव वय 25 राहणार देगाव, ता. वाई असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देगाव, ता. वाई गावच्या हद्दीत प्रताप रामचंद्र पंडित यांच्या राहत्या घरासमोर लावलेली त्यांच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एमएच 11 बीई 5640 ही 28 ते 29 डिसेंबर दरम्यान चोरीस गेली होती. याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या गुन्ह्याच्या तपास कामी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे अंमलदार यांचे खास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच गावात गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली असता हा गुन्हा देगाव गावातीलच एका संस्थेने केला असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली माहितीप्रमाणे पथकाने दिनांक 14 जानेवारी रोजी संबंधिताला भुईंज परिसरातून सीताफिने ताब्यात घेऊन त्याला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल हस्तगत केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस अंमलदार बापूसाहेब धायगुडे, सागर मोहिते, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ यांनी केली आहे.