पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अपघातातील जखमींचा विचारपूस


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । सातारा । महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी घाटात झालेल्या अपघातातील जखामींची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण, साताराचे तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जखमीपैकी तीन लहान मुलांना कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

महाबळेश्वर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर जाणाऱ्या मजुरांच्या गाडीचा अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्यामुळे हे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले. यातील सात जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका रुग्णाला उपचार करून घरी सोडण्यात आले. तर सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


Back to top button
Don`t copy text!