
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १४ जुलै २०२४ | फलटण |
फलटण येथील मुधोजी कॉलेजच्या पार्किंगमधून दि. १३ जुलै २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर स्कूटर अज्ञात चोरट्याने पळविल्याची तक्रार निखिल धर्मेंद्र मोरे (वय २२, रा. जाधववाडी, ता. फलटण) याने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
चोरीला गेलेल्या स्कुटीची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असून तिचा क्रमांक एमएच-११-सीएफ-४९४४ असा आहे. या चोरीचा अधिक तपास पो. ह. फाळके करत आहेत.
