वडले तलावातील ६१ ब्रास माती-मुरूमाची चोरी; एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
वडले (ता. फलटण) गावच्या हद्दीतील वडले तलावातील रूपये ३६ हजार रुपये किमतीची ६१ ब्रास माती वजा मुरूम रात्रीच्या वेळेस चोरून नेल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तलाठी राहुल इंगळे यांनी दिली आहे.

या प्रकरणी दत्तात्रय धोंडीराम काळे (रा. वडले, ता. फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरीची अधिक माहिती अशी, दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १०.४९ वाजता वडले, ता. फलटण गावच्या हद्दीतील पिंपळखोरी तलावामधील (महाराष्ट्र सरकार तलाव पड) गाळाची माती गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून दिवसा माती उचलण्यास परवानगी असतानादेखील दत्तात्रय धोंडीबा काळे (रा. वडले, ता. फलटण) व तीन अज्ञात इसमांनी एक जेसीबी व दोन डंपर यांच्या मदतीने तलावामधून वरील वर्णनाची व ३६,००० रुपये किमतीची एकूण ६१ ब्रास माती व वजा मुरूम ही रात्रीच्या वेळी वाहतूक करून चोरून नेऊन पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला असता दत्तात्रय धोंडीराम काळे यांनी त्याची स्कुटी शासकीय वाहनासमोर आडवी लावून अडथळा निर्माण करून माती वजा मुरूम चोरून नेली आहे, अशी तक्रार तलाठी यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दाखल केली आहे.

या प्रकरणी अधिक तपास हुलगे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!