
दैनिक स्थैर्य । दि. २१ मार्च २०२३ । सातारा । एक मिशन जुनी पेन्शनं हा सरकारी कर्मचाऱ्यांचा एकच नारा जिल्हा प्रशासनाच्या कानातं घुमतो आहे . दुपारच्या रखरखीत उन्हातं विविध शासकीय संघटनांच्या दोन हजार कर्मचाऱ्यांनी जोरदार थाळीनाद करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोल फेर धरला . पेन्शनं आमच्या हक्कांची या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले . हे आंदोलन यशस्वी करणारच असा निर्धार कर्मचारी संघटनांच्या सुकाणू समितीने केला आहे .
सुमारे वजुनी पेन्शनच्या मागणीसाठी सलग पाचव्या दिवशी दिवशीही शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिला. या दिवशीही आंदोलनाची तीव्रता कायम राहिली. दरम्यान, विरोधी राजकीय पक्षाचाही या संपाला पाठींबा मिळाला आहे. या आंदोलनात महसूल , सातारा जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी संघटना, जिल्हा रुग्णालय कर्मचारी संघटना, जिल्हा मध्यवर्ती लिपिक संघटना वर्ग ३ आरोग्य कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत .
सातारा जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, पालिका, नगरपंचायत कर्मचारी तसेच अंशकालीन कंत्राटी व रोजंदारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर पाचव्या दिवशीही ठिय्या दिला. आंदोलक कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्धा तास जोरदार थाळीनाद करत भर उन्हात चक्क फेर धरला . या फेरामध्ये शिक्षण व महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी होते . जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
समन्वय समिती निमंत्रक नेताजी दिसले, जिल्हापरिषद काका पाटील, विलासराव शितोळे, उदय शिंदे, महसूलचे सागर कारंडे, चंद्रकांत पारवे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
आगामी आंदोलन
२१ मार्च – बॉम्बे रेस्टॉरंट ते पोवई नाका तेथून जिल्हाधिकारी कार्यालय – पंधरा हजार कर्मचाऱ्यांचा मोर्चा
२३ मार्च – जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय समोर काळे झेंडे घेऊन आक्रोश आंदोलनं
२४ मार्च – माझे कुटुंब माझी पेन्शनं अभियानं जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर सहकुटुंब आंदोलन