पाच दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २२ : आजच्या व्यापारी सत्रात ऑटो, आयटी आणि राज्य कर्जदारांमध्ये विक्री दिसून आल्याने शेअर बाजारात घसरण दिसून आली. परिणामी पाच दिवसांच्या विजयी मालिकेत खंड पडल्याचे दिसून आले. निफ्टी ०.२७% किंवा २९.६५ अंकांनी घसरला आणि तो ११,१३२.६० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.६६% किंवा ५८.८१ अंकांनी घसरून तो ३७,८७१.५२ अंकांवर विसावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १४४८ शेअर्स घसरले, ११६४ शेअर्सनी वृद्धी दर्शवली तर १४७ शेअर्स स्थिर राहिले. अॅक्सिस बँक (६.६८%), टायटन (४.९६%), पावर ग्रिड (३.६०%), झी एंटरटेनमेंट (३.०९%) आणि आयटीसी (२.४४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर हिरो मोटोकॉर्प (३.३२%), बीपीसीएल (३.०८%), एचयूएल (३.०६%), टाटा मोटर्स (२.७७%) आणि टाटा स्टील (२.४९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप ०.१९% नी वाढले तर बीएसई स्मॉलकॅप हे ०.२३% नी घसरले.

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड : कंपनीचा निव्वळ नफा २६७ कोटी रुपये झाला तर महसुलात ६.७% ची घट झाली. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ३.३३% नी घसरले व त्यांनी १७२.६५ रुपयांवर व्यापार केला.

आरआयएल : कंपनीच्या जिओ प्लॅटफॉर्मवर अनेकांनी गुंतवणूक केल्याने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी १२ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेली पहिली भारतीय कंपनी ठरली. परिणामी आरआयएलचे स्टॉक्स १.६५% नी वाढले व त्यांनी आजच्या व्यापारी सत्रात २००४.०० रुपयांवर व्यापार केला.

एचयूएल : एचयूएल कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा १८८१ कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. तसेच या काळातील महसूल १०,५६०.०० कोटी रुपये झाल्याचे दर्शवले. तथापि कंपनीच्या उत्पन्नाची नोंद झाल्यानंतर स्टॉक्समध्ये ३.०६% ची घसरण झाली व त्यांनी २,२४७.०० रुपयांवर व्यापार केला.

बजाज फायनान्स लिमिटेड : बजाज फायनान्स लिमिटेडने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात १९.४% ची घसरण झाल्याचे दर्शवले. तसेच एनबीएफसीचे निव्वळ व्याज उत्पन्न १२ टक्क्यांनी वाढले. परिणामी कंपनीचे स्टॉक्स १.२९% नी वाढले व त्यांनी ३,२५० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : देशांतर्गत इक्विटी बाजारातील गुंतवणूकदारांच्या नकारात्मक भावनांमुळे भारतीय रुपयाच्या मूल्यात काहीसा बदल झाला. भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज ७४.७६ रुपयांचे मूल्य दर्शवले.

सोने : आजच्या व्यापारी सत्रात एमसीएक्सवर सोन्याचे दर सर्वाधिक वाढून ५०,००० रुपये प्रति १० ग्रामएवढे होते. कमकुवत डॉलर आणि आंतरराष्ट्रीय सोन्याच्या स्पॉट किंमतीत वाढ झाल्याने हे परिणाम दिसून आले.

जागतिक बाजार : कोव्हिड-१९ लसीची सकारात्मक बातमी असूनसुद्धा कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांमुळे जागतिक बाजाराने मिळवलेला नफा आज गमावला. नॅसडॅक ०.८१% नी घसरली तर एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० चे शेअर्स ०.९६% आणि ०.९१% असे अनुक्रमे घसरले. निक्केईचे शेअर्सदेखील ०.५८% नी तर हँग सेंग कंपनीचे शेअर्स २.२५% नी घटले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!