वाचन आणि जीवनानुभव घेतल्याशिवाय नागराज मंजुळे होता येत नाही प्रा.डॉ.प्रकाश दुकळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । सातारा । ‘’कोरोनाच्या काळात आपण भरपूर लघुपट चित्रपट पाहिले आहेत.शुटींग आणि तांत्रिक कला ही अवगत असणे ही आता आवश्यक गोष्ट झाली आहे. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाने विद्यार्थी व प्राध्यापक यांना
घडविण्याचे काम सुरु केले आहे. आम्ही कामाने शिवाजी होण्याचा प्रयत्न करीत आहोत.मराठीच्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या शासन प्रशासन ,माध्यमे यात करिअर करण्यासाठी ‘संधी आहे सर्वत्र ‘हे पुस्तक प्रकाशित केले आहे. २००८ पासून शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाने कथा लेखन ,निबंध लेखन ,काव्य वाचन ,कथाकथन, इत्यादी विविध स्पर्धा आयोजित करून कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले आहेत.११ अधिवेशनात विविध विषय घेऊन विषयज्ञान समृद्ध केले आहे.विद्यार्थी पदव्या घेतात पण साधे दैनंदिन वर्तमानपत्र नियमित वाचत नाहीत.अशाने पटकथा,साहित्य कसे लिहिणार? वाचन ,लेखन ,श्रवण,भाषण ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी जाणीवेने प्रयत्न करावेत.मराठीचे प्राध्यापक सतत वाचा म्हणतात त्याला मोठा अर्थ आहे. स्वतःला स्वतः घडवायचे असते. वाचन आणि जीवनानुभव घेतल्याशिवाय नागराज मंजुळे होता येत नाही. त्यांनी घेतलेले कष्ट ,कल्पकता ,निरीक्षण यातूनच प्रतिभा उमलत असते.’’असे विचार शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश दुकळे यांनी व्यक्त केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘लघुपट .चित्रपट ,नाट्यसंहिता लेखन कार्यशाळा’ या विषयावर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षपदी रयत शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर व रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तर विषयतज्ञ प्राचार्य डॉ.दिलीप भीमराव गायकवाड ,मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे ,डॉ.कांचन नलवडे, डॉ.विद्या नावडकर ,डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा.प्रियांका कुंभार हे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी कॉलेजने महत्वाच्या विषयावर कार्यशाळा आयोजित केली हे सांगून पुढे ते म्हणाले की’’ चित्रपट कला ही १८९५ पासून सुरु झाली .मराठीत हरिश्चंद्र फकटरी चित्रपट पहिला तर १९३० साली मराठीत चित्रपट कसा आला ते कळते. समाजाची तहान भागवणे हे चित्रपटांचे काम आहे .लघुपट कमीत कमी वेळ व कमीत कमी लांबीचा असून लो बजेटचा असतो. मनोरंजनतून प्रबोधन कसे करावे हे शिकायला हवे. पिस्तुल्या,पावती हे लघुपट पहा. सखोल जीवनार्थ चित्रपटातून मिळतो.चित्रपटात कॅमेरयाची ताकद मोठी आहे .१९५५ नंतर भारतात सामाजिक जाणीवेचा चित्रपट पाथेर पांचाली पासून सुरु झाला.चित्रपटात काळ,मिथकांचा वापर कसा केला जातो याचा अभ्यास करावा. चित्रपटाचा प्रांत पहिला पाहिजे तसेच जमेच्या बाजू,उणीवेच्या बाजू कोणत्या हे शोधले पाहिजे. चित्रपटात दिग्दर्शकाचा दृष्टीकोन येत असतो .साहित्य भाषा आणि चित्रपटाची भाषा,गुण पहावेत.दृष्टी व दृष्टीकोन समजून घ्यावेत. गल्ला भरण्यासाठी स्त्रीचा उपयोग चित्रपटानी केला आहे . पटकथेसाठी इतिहास, परंपरा,संस्कृती भाषेचा लहेजा माहित असावा असेही मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!