केंद्राने पाठवलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाने माहिती लवकरात लवकर पाठवावी; फलटण तालुका व शहर परीट (धोबी) समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now



स्थैर्य, फलटण : परीट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याकरिता केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने पाठविलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विहित प्रपत्रामध्ये राज्य शासनाने माहिती लवकरात लवकर पाठवावी असे आवाहन फलटण तालुका व शहर परीट (धोबी) समाजाच्यावतीने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे केलेली आहे.

या वेळी परीट (धोबी) समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानेश्वर ननवरे, दिलीप ननवरे, अनिल ननवरे, राजेंद्र राक्षे, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे, फलटण तालुका परीट समाज संघटनेचे अध्यक्ष हेमंत ननवरे, राहुल सोनटक्के, प्रशांत शिंदे, संतोष ननवरे, राजेंद्र ननवरे, अक्षय तळेकर, वैभव ननवरे, रितेश ननवरे, दादा ननवरे, मयूर हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) समाज आरक्षण समन्वय समिती यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने अनुसूचित जाती मध्ये समाविष्ट करण्याकरिता केंद्रसरकारने पाठवलेल्या प्रपत्राची माहिती भरून त्वरित केंद्र सरकारकडे पाठवावी व परीट समाजास न्याय मिळवून द्यावा. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!