वाढत्या मृत्यूदरांचे राज्य सरकारला गांभीर्य नाही – खा. नारायण राणे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ०५ : कोरोना संकटकाळात महाराष्ट्र राज्य रूग्णसंख्येत आणि मृत्यूदरातही अव्वल आहे. हा मृत्यूदर कमी करून अधिकाधिक लोकांना कोरोनामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, राज्य सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे खा. नारायण राणे यांनी मंगळवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

राणे म्हणाले की, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेगणिक वाढतच चालली आहे. मृत्यूदराचे टक्केवारीही कमी होत नाही. तरी राज्याचे मुख्यमंत्री हे घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्य कारभार सांभाळतायेत. ‘सामना’ मुखपत्रातून मुलाखत देताना कोरोना परिस्थितीचा उल्लेख करत नाहीत. या मुलाखतीतून ते आपले अज्ञान जनतेला दाखवून देतात. मुख्यमंत्री घरातच बसून राहिल्यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचाच दबाव नाही. या साऱ्या गोष्टीमुळे आपले राज्य सर्वच क्षेत्रात पिछाडीवर जात आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहे. सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकरणी पाटणामध्ये एफआयआर दाखल झाली मात्र मुंबई पोलिसांनी अजुन एफआयआर दाखल केलेली नाहीये. या प्रकरणावर जाणूनबुजून दुर्लेक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्विट मध्ये काहिही चुकीचे नाही तेव्हा त्यावर कोणाला टीका करण्याचाही अधिकार नाही असेही खा. राणे म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!