कारंदेवा या 11 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या मराठी चित्रपटाच्या गाण्यांनी अक्षरशा जनतेच्या मनावर भुरळ घातली आहे


दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन सारख्या ग्रामीण भागातील निर्माते प्रशांत शिंगटे यांनी तयार केलेला मराठी चित्रपट का रं देवा हा चित्रपट 11 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून एक आदर्शमय प्रेम कथा दाखवणारा हा चित्रपट निर्माते प्रशांत शिंगटे व दिग्दर्शक रणजित जाधव यांनी तयार केला आहे यामध्ये मोठी स्टारकास्ट घेण्यात आलेली असून मयूर लाड, मोनालीसा बागल, नागेश भोसले, अरुण नलावडे, सूरज चव्हाण, किरण जाधव यासारखे अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आपणास का रं देवा च्या माध्यमातून पहावयास मिळणार आहेत तसेच या चित्रपटाची गाणी नुकतीच प्रदर्शित झाली असून प्रत्येक गाणे हे ग्रामीण व शहरी भागातील जनता अक्षरशः डोक्यावर घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तसेच निर्माते प्रशांत शिंगटे व त्यांची टीम का रं देवा चे प्रमोशन अगदी तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत करताना दिसत आहे. एक युवा निर्माता व यशस्वी उद्योजक प्रशांत शिंगटे यांचे वेगवेगळ्या माध्यमातून अभिनंदन व स्वागत केले जात आहे. हा आगामी मराठी चित्रपट का रं देवा संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावेल यात काही शंका नाही असे मत निर्माते प्रशांत शिंगटे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!