दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा उद्या बालेवाडी, पुणे येथे संपन्न होणार होणार असल्याची माहिती शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कार शासनाने जाहीर केलेले आहेत. या पुरस्कारांचे स्वरूप गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, जीवन गौरव पुरस्कारासाठी रोख रू. ३,००,०००/- व इतर सर्व पुरस्कारांसाठी प्रत्येकी रोख रू. १,००,०००/- प्रमाणे गौरविण्यात येणार आहेत.
हा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दि. २८ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपन्न होणार आहे.