सुरवडीजवळ कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
जगताप वस्ती (सुरवडी, ता फलटण) येथे लोणंद ते फलटण जाणार्‍या रस्त्यावर काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कारने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अनोळखी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताची अधिक माहिती अशी, दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजण्याच्या सुमारास जगताप वस्ती, सुरवडी (ता. फलटण) येथे लोणंद ते फलटण जाणार्‍या पुलाजवळ मनोज नंदकुमार मुळीक हा त्याच्या मोटरसायकल (एमएच-११-बीटी-५५७६) वरून लोणंदहून फलटणकडे जात असताना त्याच्या मोटरसायकलला पाठीमागून येणार्‍या इनोव्हा कार (एमएच-४६-सीएच-७२७५)ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मनोज मुळीक हे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचा अधिक तपास पो.हवा. पिसे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!