लॉजिस्टिक कंपनी ‘पिकर’ची सेवा १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध


स्थैर्य, मुंबई, दि. १७: ई-कॉमर्स व्यवसायासाठी भारतातील सर्वात मोठी लॉजिस्टिक आणि शिपिंग सॉफ्टवेअर कंपनी पिकरने टिअर २ आणि ३ शहरांतील विक्रेत्यांना समर्थन देण्यासाठी ऑर्डर प्रक्रिया सेवा आता मराठी, हिंदीसहित १० हून प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. ही नवी सुविधा नव्या युगातील लोकल बिझनेस इनेबलर्स, हायपरलोकल बिझनेस अॅग्रीगेटर्स आणि वैयक्तिक हायपरलोकल अॅप्लीकेशनला त्यांच्या स्थानिक भाषेत ऑर्डर डिटेल्स (ग्राहकाचे नाव, पत्ता इत्यादी) स्वीकारण्याची परवानगी देते.

पिकरचे सह संस्थापक आणि सीईओ रितिमान मजूमदार म्हणाले ,“या महामारीदरम्यान ई-कॉमर्स उद्योगात मोठी वृद्धी दिसून येत आहे. मात्र भारतातील टिअर २ आणि ३ शहरांतील विक्रेत्यांना याचा लाभ मिळत नाही. प्रामुख्याने कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेनंतर भाषेतील अडथळ्यांमुळे मागणीत कमतरता जाणवत आहे. त्यांचे व्यवसाय विनाअडथळा स्वरुपात संचलित करणे आणि त्यांना विकासासाठी महत्त्वपूर्ण गती प्रदान करण्यात मदतीकरिता आम्ही त्यांना ऑर्डर डेटा इनपुटकरिता कोणत्याही भाषेच्या अडथळ्याविना ऑर्डर प्रोसेसिंगची परवानगी देत आहोत. यामुळे त्यांना ग्राहक अनुभव तर वाढेलच, शिवाय अतिरिक्त ऑर्ड़र प्राप्त करण्याची परवानगी देईल. तसेच आमच्यासाठीही बाजाराच्या नव्या संधी खुल्या होतील.”

पिकर मोठ्या प्रमाणावर विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स बिझनेससोबत आपले वेअरहाऊस/ फुलफिलमेंट सर्व्हिसच्या माध्यमातून पे-पर-यूझ मॉडेलमध्ये लहान व्हॉल्यूम ब्रँड्समध्ये विक्री करणाऱ्यांसाठी लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंट्री सोल्युशन्सला सुव्यवस्थित करत आहे. लॉजिस्टिक्स सेवांना इन्व्हेंट्रीच्या इंटेलिजंट आणि डायनॅमिक अलोकेशनशी जोडत विक्रेता बेस्ट डिलिव्हरी टाइमपर्यंत पोहचून प्राप्त करू शकतात. तसेच सरासरी डिलिव्हरी टर्नअराउंड टाइम सुमारे २०% पर्यंत कमी करण्यासह आपला संपूर्ण लॉजिस्टिक खर्च १०-३० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात. आपले सामान शिप केल्यानंतरच वसूलीची परवानगी दिली जाते.


Back to top button
Don`t copy text!