स्थैर्य, सातारा, दि. 18 : थेंब या डॉक्युड्रामाला व्हायरस मराठी लॉकडाऊन फिल्म फेस्टिव्हल मध्ये एकूण तीनशे पाच स्पर्धकातून डॉक्युड्रामा विभागात दुसरं पारितोषिक मिळालं. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरूनही स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या लघुपटाची संकल्पना आणि दिगदर्शन धैर्यशील उतेकर यांचं आहे. या डॉक्युड्रामाचं चित्रीकरण करताना लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले गेले. पाण्याची समस्या हा विषय घेऊन या डॉक्युड्रामाची निर्मिती केली आहे. या डॉक्युड्रामा मध्ये एकही शब्द बोलला गेला नाही, फक्त हवेचा आवाज आणि पाण्याला निघालेल्या महिला एवढंच चित्रीकरण केलं आहे. पाणी आणणे हे किती वेळ खाऊ काम आहे आणि त्यासाठी गावातल्या महिलांचा अख्खा दिवस जातो. आणि हे किती कंटाळवणं काम आहे याच चित्रीकरण या डॉक्युड्रामामध्ये केलेलं आहे. या स्पर्धेचं परीक्षण अरविंद जगताप, संतोष कोल्हे, समीर पाटील आणि सोनाली कुलकर्णी या मान्यवरांनी केलं.
या डॉक्युड्रामामध्ये ज्योती चन्ने, रुपाली इंगवले आणि साक्षी इंगवले यांनी भूमिका केली आहे तसेच या डॉक्युड्रामाची निर्मिती आशा ह.उत्तेकर यांनी केले आहे तर चित्रीकरण केतन मोहिते, संकलन शशिकांत शेलार, निर्मिती साहाय्य अमोल जोशी आणि साहाय्यक दिग्दर्शक अभिषेक परदेशी यांनी केले आहे. सागर चन्ने आणि संतोष चन्ने यांचं या डॉक्युड्रामाला विशेष सहकार्य लाभले.
या विजयाबद्दल नितीन दीक्षित, प्रमोद कोपर्डे, धोंडिबा कारंडे, बाळकृष्ण शिंदे, किरण ढाणे, संदीप जंगम, रविंद्र डांगे, प्रसाद नारकर, प्रसाद देवळेकर, राजेश मोरे, प्रकाश टोपे, नितीन देशमाने, शिवानी पावटे आदी मान्यवरांनी विजेत्यांचा अभिनंदन केलं.