दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२३ | फलटण | फलटण नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे यांचे नाव पत्रिकेवर न टाकल्याने सोशल मीडियावर नगरपरिषदेतील सत्ताधारी गटाला सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून चांगलेच धारेवर धरण्यात आले. काल विविध विकासकामांच्या पत्रिका ह्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या त्यामध्ये माजी नगरसेवक व नगरसेविकांची नावे होती; परंतु सलग ५ वर्षे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद भूषविलेल्या सौ. नीता मिलिंद नेवसे यांचे नाव नव्हते. त्यामुळे सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतगर्त गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
सुमारे दोन वर्षांपासून फलटण नगरपरिषदेवर प्रशासक राज आहे. प्रशासक म्हणून फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे कामकाज बघत आहेत. त्यापूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. सन २०१६ साली झालेल्या निवडणुकीत फलटण नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पदी सौ. नीता मिलिंद नेवसे ह्या ५३३६ मतांनी लोकनियुक्त नगराध्यक्षा पदी विराजमान झाल्या होत्या. त्यांच्यासोबत कामकाज करणाऱ्या सत्ताधारी गटाच्या नगरसेवक व नगरसेविकांची नावे ही निमंत्रण पत्रिकेमध्ये होती. परंतु सौ. नीता मिलिंद नेवसे यांचेच नाव पत्रिकेमध्ये नसल्याने विविध चर्चा ह्या सोशल मीडियावर रंगलेल्या आहेत.
लोकनियुक्त नगराध्यक्षा यांचे नाव पत्रिकेत नाही व स्वीकृत नगरसेवक यांचे नाव पत्रिकेत आहे. किती दडपशाही हे यावरूनच समजत आहे; असे मत माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.
सौ. नीता मिलिंद नेवसे ह्या ओबीसी नेत्या असल्याने त्यांचे नाव मुद्दामून डावलले असून हे फलटण सारख्या सुसंकृत शहरासाठी योग्य नाही; यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतः लक्ष घालावे व याचा नक्की सूत्रसंचालक नक्की कोण आहे ? हे शोधावे; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी सोशल मीडियावर केला आहे.
यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी सदरील घटना म्हणजे जाणीवपूर्व केलेले कट कारस्थानाचा हा प्रकार दिसून येत आहे; असे मत व्यक्त केले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमीर शेख यांनी “ओबीसी प्रतिनिधी हा नावापुरताच आहे; कारभार दुसर्याकडून चालतो” असे मत नोंदवले आहे.
ओबीसी, एसी, एसटीची मत चालतील मान, सन्नामाना वेळी आज अपृष्श समजल जात आहे; हे वास्तव आहे. हे आता वास्तव लक्षात यायला लागल आहे. लवकरच त्याचे निकाल पण दिसतील. सौ. नीता नेवसे यांना नगराध्यक्षा झाल्यापासुनच ही वागणुक आहे. राजमाता अहिल्यादेवींच्या पुतळ्याला आतुन बाहेरुन विरोध करणारे पण समाजाचाच्या लक्षात आहेत. वेळ आले की सगळे बाहेर येणार व त्याचे परिणाम पण भोगावे लागणार आहेत; असे मत शिवसेनेचे नेते नानासाहेब उर्फ पिंटू इवरे यांनी व्यक्त केले आहे.
यासोबतच विविध मान्यवरांनी आपली मते सोशल मीडियावर साईट्सवर व्यक्त केली आहेत.