नटराज मंदिरात पूर्णाहुतीने अनुष्ठानाची महाशिवरात्रीला सांगता


सातारा – श्री नटराज मंदिरातील रुद्र अनुष्ठानची सांगता पूर्णाहुती ने करताना वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी, जगदीश भट, रमेश शानभाग. (छाया : अतुल देशपांडे)

स्थैर्य, 15 फेब्रुवारी, सातारा :  नटराज मंदिरात गेले तीन दिवस महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या रुद्र अनुष्ठान कार्यक्रमांमध्ये सकाळी वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी आणि वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट यांच्या उपस्थितीत रुद्र हवन करण्यात आले .

या कार्यक्रमांमध्ये नटराज मंदिराच्या वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट, अविनाश वाळींबे, चैतन्य वाळिंबे ,पार्थ जोशी , प्रमोद कुलकर्णी ,अद्वैत देशमुख यांचे सह नटराज मंदिराच्या ब्रह्मावृंदांनी सहभाग घेतला.यावेळी मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग आणि उषा शानभाग यांच्या हस्ते या हवनाची पूर्णाहुती करण्यात आली .

त्यानंतर पाण्याने भरलेले कुंभ डोक्यावर घेऊन या ब्रह्मवृंदांनी मंदिर परिसरात वाजत गाजत मिरवणूक काढून मंदिरात असलेल्या मूलनाथेश्वराला जलाभिषेक घालण्यात आला यावेळी वेदमंत्रांचा जयघोष करण्यात आला यावेळी उपस्थित शेकडो शिवभक्तांनी.. हर हर महादेव ..चा गजर केला सायंकाळी मंदिरातील असलेल्या श्री नटराज पाचू पिंडीस कलशाभिषेक, विशेष अभिषेक घालण्यात आला तसेच मंदिर दर्शनासाठी रात्री बारा वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले होते .महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणात काढलेली भव्य विविध रंगातील रांगोळी विशेष लक्षवेधक ठरत आहे तसेच सध्या मंदिराच्या चारही दिशांच्या गोपूरांवर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधक ठरत आहे.महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिर व्यवस्थापनाने रांगा लावून भक्तांची दर्शनाची विशेष व्यवस्था केली होती .तसेच दर्शनानंतर साबुदाणा खिचडीचा प्रसाद वितरण करण्यात आला.मंदिराचे वतीने वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट ,व्यवस्थापक चंद्रन, मार्गदर्शक नारायणराव यांचे सह महाशिवरात्री महोत्सवाच्या संयोजिका सौ.उषा शानभाग आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

महाशिवरात्री निमित्त नटराज मंदिरात महारक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विशेष करून युवा पुरुष आणि युवतींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन या रक्तदान शिबिरात रक्तदान करून सहभाग घेतला. या सर्व रक्तदात्यांना मंदिराचे वतीने प्रशस्तीपत्र तसेच भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला


Back to top button
Don`t copy text!