फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीवर राजे गटाची एक हाती सत्ता; विडणीच्या सरपंच पदी भाजपाचे सागर अभंग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांचा निकाल लागला. २४ पैकी ४ ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील विडणी ग्रामपंचायतीमध्ये पॅनल राजे गटाचे निवडून आले आहे तर लोकनियुक्त सरपंच पदी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खासदार गटाचे सागर अभंग हे निवडून आलेले आहेत. तर सह्याद्री चिमणराव कदम यांनी गिरवी ग्रामपंचायतीवर त्यांच्या झेंडा फडकावला आहे. तालुक्यातील एमआयडीसी असलेली सूरवडी ग्रामपंचायतीची सत्ता हि जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांच्याकडेच राहिली आहे. तालुक्यामध्ये दोन ते तीन ठिकाणी वगळता सर्व ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाची एक हाती सत्ता राखली आहे.

फलटण तालुक्यातील वेळोशी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी व मीरेवाडी ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या बिनविरोध संपन्न झालेल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुराळा उडालेला होता. त्यामध्ये रविवार, दि. १८ रोजी मतदान झाले व आज दि. २० रोजी फलटण येथील शासकीय धान्य गोदामामध्ये मतमोजणी संपन्न झाली. यावेळी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव, अप्पर तहसीलदार दादासाहेब दराडे, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे यांच्यासह प्रमुख अधिकारी व राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले होते. त्यामध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाची एक हाती सत्ता अबाधित राहिली आहे. तालुक्यातील २४ ग्रामपंचातीच्या निवडणुकांपैकी २२ ग्रामपंचातीवर राजे गटाची सत्ता आली असल्याचा दावा राजे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. उरलेल्या दोन ग्रामपंचायतीपैकी गिरवी ग्रामपंचायत ही सह्याद्री चिमणराव कदम यांची तर सूरवडी येथे जेष्ठ नेते प्रल्हाद साळूंखे – पाटील यांची सत्ता स्थापन झालेली आहे. यासोबतच विडणी ग्रामपंचायतीच्या पॅनलमध्ये बहुमत हे राष्ट्रवादी प्रणित राजे गटाचे आहे तर सरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे सागर अभंग हे निवडून आलेले आहेत.

फलटण तालुक्यातील बरड, वडले, सोमंथळी, चौधरवाडी, कुरवली खु., ताथवडा, मठाचीवाडी, झडकबाईचीवाडी, वेळोशी, तरडफ, पिंप्रद, विडणी (सरपंच वगळता), वाठार निंबाळकर, दुधेबावी, आदर्की बु., आदर्की खु., पाडेगाव, सालपे, मिरेवाडी, चव्हाणवाडी, कुसूर या ग्रामपंचातीवर विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाची सत्ता आली आहे.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

विडणी ग्रामपंचातीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात लोकनियुक्त सरपंच पदी सागर अभंग विराजमान झालेले आहेत. यासोबतच जेष्ठ नेते प्रल्हाद साळूंखे – पाटील यांच्या नेतृत्वात सुरवडी ग्रामपंचातीवर पाटील पॅनलचा झेंडा फडकला आहे. युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांच्या नेतृत्वात गिरवी ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे.

तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायत निवडणूक हि बिनविरोध झालेली आहे. त्यावर भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रवादीने सुद्धा आपला दावा सांगितला आहे. मानेवाडीच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भाजपाचे नेते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबतचा तर राष्ट्रवादीचे नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सोबतचा सुद्धा फोटो सोशल मीडिया साईटवर व्हायरल झाला होता. त्यामुळे नक्की मानेवाडी कुणाकडे हे नक्की सांगता सांगणे अवघड ठरेल. किंवा गावचा विकास करण्यासाठी गावपातळीवर पदाधिकारी हे दोन्ही नेत्यांकडे तर गेले नसतील ना ? असा सवाल उपस्थित राहत आहे.


Back to top button
Don`t copy text!