बेंदूरच्या तोंडावर कातरखटाव ला राजस्थानी कनेक्शन ने चिंता वाढली


पाहणी करताना तहसिलदार अर्चना पाटील व अधिकारी(छाया: समीर तांबोळी)

स्थैर्य, कातरखटाव दि. 03 : शनिवारी संध्याकाळी राजस्थान वरून  कातरखटाव ला आलेल्या  बावीस  वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने  कातरखटाव व  परीसरातील लोकांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे.

मिरज- भिगवण राज्यमार्गावर सुमारे सहा हजार लोकवस्ती असणाऱ्या कातरखटाव येथे गेली तीन महिन्यापासून  लोकडाउन ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. परिसरातील वीस खेड्यांचे केंद्रबिंदू असणाऱ्या कातर खटाव येथे नित्याचीच गर्दी असते.प्रशासन ,आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर पालन  करन्यात येत आहे.त्यामुळे मोठ्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही. मात्र शनिवारी रात्री राजस्थान वरून आलेल्या बावीस वर्षीय युवकास सोमवार पासून  ताप आल्याचे जानवू लागले  मंगळवार तापाबरोबरच  जुलाबाचाही त्रास सुरु झाल्याने उपचारासाठी  खासगी रुग्णालयात नेण्यात आले त्या वैद्यकीय अधिकाऱयांनी  प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचार घेण्यासाठी सांगितले. त्याच्या शरिराचे तापमान अतिउच्च असल्याने  वैदृयकिय अधिका-यानी त्याला सातारा येथील विलगीकरण कक्षात पाठविले. तेथे त्याचे घशाचे नमुने घेण्यात आले व ते पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्याचा  अहवाल पॉजेटीव्ह आल्याने प्रशासनाची तरांबळा उडाली. अरोग्य विभाग व प्रशानाने युवकाच्या राहत्या स्थळी भेट देवून त्याच्या संपर्कात असलेल्या तेरा जनांना  पुसेगाव च्या  विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.

दरम्यान ,तहसिलदार अर्चना पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, पोलिस निरीक्षक अशोक पाटील, डॉ. वैशाली चव्हाण, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील आदींसह कोरोना कमेटीतील अधिकाऱ्यांनी गावास भेट देत परिसर सील करून चौदा दिवस व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आत्ताच कुठे दुकाने सुरू झाली म्हणून आम्ही नउ ते दहा दुकानदारांनी शेतक-यांसाठी लागणारा बेंदूर सणाचा प्रत्येकी एक लाख रुपयाचा माल दुकानात भरला आहे. एैन सनाच्या तोंडावर कोरोना रुग्ण सापडल्याने आमची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे आमच्या मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  — संभाजी बागल

                 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!