PSLV रॉकेटच्या माध्यमातून 19 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले, पीएसएलव्ही रॉकेटचे हे 53 वे उड्डाण


स्थैर्य ,चेन्नई, दि, २८: आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून रविवारी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी 19 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले. या रॉकेटमध्ये ब्राझीलच्या अमेझोनिया-१ उपग्रहासोबत १८ नॅनो उपग्रहही लाँच केले. यात १३ अमेरिकेचेही आहेत. मुख्य उपग्रह भारतीय नसलेली ही पहिली लाँचिंग आहे. पीएसएलव्ही रॉकेटचे हे ५३ वे उड्डाण आहे. भारताने आतापर्यंत ३४ देशांचे ३४२ उपग्रह लाँच केले आहेत.

2021 मध्ये भारताचे हे पहिले अंतराळ अभियान PSLV रॉकेटसाठी जास्त मोठे असेल कारण याची उड्डाण वेळ 1 तास 55 मिनिट आणि 7 सेकंदाची राहील.

पीएसएलव्ही रॉकेटच्या लाँचिंगमध्ये २१०-२७० कोटी रुपये खर्च
ॲमेझॉनिया- १ उपग्रहाचे वजन ६३७ किलो आहे. पीएसएलव्हीची क्षमता १७५० किलो वजन अंतराळाच्या कक्षेत घेऊन जाण्याची आहे. यामुळे १८ इतर उपग्रहही समाविष्ट करण्यात आली आहेत. इस्रोनुसार पीएसएलव्ही रॉकेटच्या लाँचिंगमध्ये २१०-२७० कोटी रुपये खर्च, जो प्रतिकिलो लाँचिंग खर्चाबाबत अमेरिकेची अंतराळ कंपनी स्पेसएक्सच्या एवढाच येतो. मात्र, येत्या काही महिन्यांत भारतातून उपग्रह सोडणे किफायतशीर होईल आणि लहान उपग्रह सोडण्यासाठी मोठा उपग्रह सोडण्याची वाट पाहावी लागणार नाही.

इस्रो आगामी दोन महिन्यांत एसएसएलव्हीची (स्माॅल सॅटेलाइट लाँच व्हेइकल) चाचणी घेणार आहे. तसेच तामिळनाडूतील थुथुकुडी जिल्ह्यातील कुलाशेकरट्टीनममध्ये प्रक्षेपण साइट तयार केली जाईल. यानंतर प्रक्षेपणाचे कामकाज वाढेल आणि ५०० किलोपर्यंतचे प्रक्षेपण एसएसएलव्हीद्वारे होईल. यात मोठ्या आणि राष्ट्रीय महत्वाच्या प्रक्षेपणात पीएसएलव्ही आणि जीएसएलव्हीचा वापर केला जाईल.


Back to top button
Don`t copy text!