दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । फलटण । सर्वांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिस बांधवांप्रती आपले प्रेम, स्नेह व ऋनुबंध घट्ट करण्यासाठी आज राखी पौर्णिमेचे औचित्य साधून ऑन धिस टाईम मीडिया प्रा. लि., माहेर कट्टा व तिरंगा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पोलीस बांधवांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मुधोजी महाविद्यालय, फलटण एन.एस.एस. विभाग, एन.सी.सी. विभाग आणि लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन व लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनम यांच्या सहभागाणे अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमध्ये फलटण पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस बांधवाना लायन्स क्लब च्या भगिनी आणि एन.एस.एस. च्या विध्यार्थीनी व एन.सी.सी विध्यार्थीनी यांनी राखी बांधून भाऊ-बहीण यांच्या गोड नात्याचा ऋनुबंध घट्ट केला.
आजच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘बीजराखी’ ची संकल्पना. बीजराखी म्हणजे आपल्या आसपास ज्या वृक्षवल्ली आहेत त्यांच्या बिया असतात त्या बियांपासून राखी तयार करायची आणि राखी पौर्णिमा झाल्यानंतर त्या राखी मधील बिया कुंडीत टाकून एखादे चांगलं झाड वाढवू शकतो. हि अतिशय अनोखी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण अशी संकल्पना या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनकडून राबवण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनम यांच्या वतीने 75 भारतीय झेंड्याचे याप्रसंगी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ पत्रकार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री रवींद्र बेडकीहाळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ‘पोलीस यंत्रणा नेहमीच आपले कार्य कर्तव्य निष्ठेने पार पाडत असते. सर्व विभागांमध्ये कामाचे टाईम लिमिट असते परंतु पोलीस यंत्रणेला कुठलेही वेळेचे बंधन नाही त्यांना सदैव तत्पर राहावे लागते. आपण अशा सांस्कृतिक कार्यक्रममधून त्यांना आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली तर आपल्या कर्तव्य विषय प्रेम व आपुलकी वाटून समाजाच्या प्रती ते अजून जोमाने काम करू शकतील. त्यांना वर्षभर प्रत्येक सणाला आपल्या घरी बोलवून आपण त्यांना आपल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी केलं तर त्यांचे मनोबल वाढून आपलं कर्तव्य पार पाडताना त्यांना आनंद मिळेल.’
याप्रसंगी मधोजी महाविद्यालयचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार सर, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. निलम देशमुख मॅडम, प्रा.पडवी सर यांनी तर पोलीस विभागातर्फे गायकवाड मॅडम व नाळेसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मानव अधिकारचे समीर तांबोळी, लायन्स क्लब ऑफ फलटण (गोल्डन) च्या चार्टर प्रेसिडेंट सौ. उज्वला निंबाळकर , गोल्डन अध्यक्षा सौ. सुनंदा भोसले, गोल्डन सेक्रेटरी सौ. सुनीता कदम, सौ. नीलम देशमुख,सौ. वृक्षला भोसले या उपस्थित होत्या. तर लायन्स क्लब ऑफ प्लॅटिनम यांच्या वतीने अध्यक्षा एमजीएफ ला.सविता दोशी, संस्थापक अध्यक्षा एमजीएफ ला. नीलम लोंढे-पाटील, सदस्य ला. सौ. मीना निंबाळकर, ला. मंगल घाडगे, ला. रश्मी चव्हाण, ला. शिवानी गांधी या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी डोहेस या NGO तर्फे सौ. सरोजिनी अहिवळे आणि ऑन दिस मीडिया प्रायव्हेट लिमिटेड चे पुणे विभागातर्फे जीएम केळकर सर हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. शितल अहिवळे सर यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानण्याचे काम एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी केले. पोलीस उपाधीक्षक तानाजी बरडेसाहेब, पोलीस निरीक्षक फलटण शहर किंद्रेसाहेब, पोलीस निरीक्षक ग्रामीण गोडसेसाहेब, यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्याबद्दल विशेष आभार मानण्यात आले.