स्थैर्य, वाई, दि. १५ : नावेचीवाडीतील ओढ्यावरील नवीन पुलाचे काम युद्धपातळीवर करण्यात येवून वाईच्या पश्चिम भागाला दळण-वळणासाठी भेडसावत असणारा प्रश्न मार्गी लागला आहे, असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी लोकार्पण सोहळा कार्यक्रमात केले. नावेचीवाडीतील खांबोळ्या ओढ्यावरील नवीन पुलाचे लोकार्पण सोहळा आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, तीर्थक्षेत्र आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, रमेश आप्पा गायकवाड, ठेकेदार मंगलसिंग परदेशी, नगरसेवक सौ. शीतल शिंदे, अजित शिंदे, प्रदीप चोरगे, राजेश गुरव, चरण गायकवाड, माजी नगरसेवक दीपक हजारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोकराव सरकाळे, प्रसाद मामा देशमुख, किरण काळोखे, प्रा. शालीवान नलावडे, चंद्रकांत शिर्के, नाना शिंदे, कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी, कंन्सल्टंट इंजिनियर मोहन काटकर, पालिका बांधकाम विभाग अभियंता सचिन धेडे, जोशी, संतोष परदेशी, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. मकरंद पाटील म्हणाले, तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभळी खोर्याला जोडणार्या नावेचीवाडी येथील खांबोळ्या ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड पडल्याने चाळीस गावातील लोकांच्या जांभळी खोर्यात जाणार्या एस.टी. व जड वाहनांची वाहतूक खंडित करण्यात आली होती. त्यामुळे या भागतील नागरिकांची गैरसोय होत असल्याने वाई नगरपालिकेने अतिशय युद्ध पातळीवर या पुलाचे काम ठेकेदार मंगलसिंग परदेशी यांच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. पालिकेने सदर पुलाचे अंदाजे 74 लाख 84 हजार 973 रुपये खर्चाचे नवीन पुलाचे बांधकाम जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून हाती घेतले होते.मात्र त्यानंतर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाला असताना सुद्धा काम युद्ध पातळीवर करण्यात पालिकेला यश आले आहे. प्रारंभी आ. मकरंद पाटील व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून, फीत कापून व शिल्डचे अनावरण करून करण्यात आले. यावेळी नावेचीवाडी, गंगापुरी व वाईतील नागरिकांची उपस्थिती होती.