राष्ट्रपती आणि पंतप्रधान राज्यपालांच्या एनईपी -2020(NEP-2020)परिषदेला संबोधित करणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.७: आदरणीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांच्या उद्या दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावरील परीषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने “रोल आँफ एनईपी 2020 (राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची भूमिका)” ही परीषद आयोजित केली आहे.

एनईपी -20200 हे एकविसाव्या शतकातील शैक्षणिक धोरण असून 1986 साली घोषित झालेल्या शैक्षणिक धोरणानंतरचे नंतरचे पहिले धोरण आहे. एनईपी -2020 धोरणाद्वारे शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणात मोठे बदल अपेक्षित आहेत.

या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे समदृष्टी असलेला उत्साही समाज घडविण्याचा प्रयत्न आहे. भारताला जागतिक सर्वोच शक्तिस्थान बनविण्यासाठी भारताची स्वतःची शैक्षणिक व्यवस्था बनविण्याचे या धोरणाचे ध्येय आहे.

हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाच्या समग्र शैक्षणिक व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणेल आणि त्यात नवे बदल आणून शैक्षणिक पर्यावरणीय व्यवस्थेला उत्साहीत करत आदरणीय पंतप्रधानांच्या यांच्या कल्पनेतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करेल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात देशभरात विविध वेबिनार, दूरदृश्य परीषदा ,बैठका आयोजित केल्या जात आहेत.

शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे उच्च शिक्षणातील बदलात्मक सुधारणा या विषयावर नुकतीच एक परीषद झाली ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले होते.

राज्यपालांच्या या परिषदेला विविध राज्यातील शिक्षण मंत्री ,राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरीष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

या परीषदेतील आदरणीय राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे भाषण दूरदर्शनवर लाईव्ह दाखविण्यात येईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!