वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद; शेजारील राष्ट्रांना संरक्षण मंत्र्यांचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२३ । छत्रपती संभाजीनगर । संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यात दोन्ही शेजारील राष्ट्रांना आरपारचा इशारा दिला असून वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद भारतीय सैनिकांमध्ये आहे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. रेल्वेस्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते. त्यांनी जमलेल्या हजारो जनसमुदायाला ‘ए मेरे कुुटुंब के लोगो’ या शब्दाने साद दिली.

ते म्हणाले, आजदेखील हल्दी घाटी असेल की गलवान घाटी. शत्रूंच्या कारवायापुढे भारताची मान ना कधी झुकली ना यापुढे कधी झुकणार नाही. शेजारील चीन राष्ट्राने चीनने गलवान घाटीत जे केले, ते संतापजनक होते. आम्ही कुणाला छेडणार नाही, पण जो कोणी आम्हाला छेडेल, त्याला सोडणार नाही, हा आपला संकल्प आहे. ही प्रेरणा आम्हाला महाराणा प्रतापसिंह यांच्यापासून मिळाली आहे.दुसरा शेजारचा राष्ट्र दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तो यात कधीही यशस्वी होणार नाही. आम्ही शत्रूला इकडेही मारू शकतो आणि गरज पडली तर त्यांच्या देशात घुसूनदेखील मारू शकतो, असा संदेश आपल्या सैनिकांना दिला. हीच आहे भारताची ताकत, असे राजनाथ म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!