दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | सातारा | महाराष्ट्रात,त्रिपुरा चे कारण पुढे करून दंगली भडकवणाऱ्यांना अटक करून कडक शासन करावे , अशी मागणी भाजप तर्फे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या पत्रावर पोलीस अधीक्षक साहेब, सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात विनंती करण्यात आली आहे की, महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे साताऱ्यात दंगली घडू नयेत या साठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि कोणीही अशाप्रकारे दंगली , जाळपोळ करणार नाही याची खबरदारी घ्यावी , त्याच प्रमाणे दंगलीस प्रोत्साहन देण्यासाठी रोहिंग्या, बांगलादेशी, पाकिस्तानी, तालिबानी जर साताऱ्यात लपून बसले असतील तर त्यांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांना ठेवून घेणाऱ्यांवर कारवाई करून , सातारा जिल्ह्यातील शांतता अबाधित राहील या साठी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .निवेदनाची प्रत माहिती आणि कार्यवाही साठी , मा जिल्हाधिकारी साहेब सातारा, यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.
या वेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार,जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नगरसेवक विजय काटवटे, नगरसेवक सुनील काळेकर, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ उत्कर्ष रेपाळ, युवा मोर्च्या शहर अध्यक्ष विक्रम बोराटे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.