वित्तीय, दूरसंचार समभागांच्या कामगिरीने शेअर बाजार सावरला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

एंजल
ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री. अमर देव सिंह

स्थैर्य, मुंबई, दि. २:आजच्या व्यापारी सत्रात वित्तीय, दूरसंचार
आणि धातू समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. निफ्टीत
०.७३% किंवा ८२,७५ अंकांची वृद्धी झाली व ११,४००० अंकांची पातळी ओलांडत ११,४७०.२५ अंकांवर
पोहोचला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.७१% किंवा २७२.५१ अंकांनी वाढून ३८,९००.८०
अंकांवर स्थिरावला.

एंजल
ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह
यांनी
सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात भारती एअरटेल (७.०९%), जेएसडब्ल्यू स्टील (६.५४%),
हिंडाल्को (५.२६%), एशियन पेंट्स (४.४१%) आणि बजाज फायनान्स (४.३६%), ओएनजीसी (२.८७%)
अॅक्सिस बँक (१.९६%), अदानी पोर्ट्स (१.३४%) आणि इन्फोसिस (१.५१%) हे निफ्टीतील टॉप
लूझर्स ठरले. निफ्टी मेटल हा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा निर्देशांक ठरला व ३.४१ टक्क्यांनी
वधारला. बीएसई मिडकॅप १.१६% नी वाढला आणि बीएसई स्मॉलकॅपने ०.५४% ची वृद्धी घेतली.

अशोक
लेलँड लि.:
ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या एकूण वाहन विक्रीत ३१%
ची म्हणजेच ६,३२५ युनिटची घट झाली. ऑगस्टमध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री ५,८२४ एवढी
होती. घसरण होऊनही, कंपनीचे स्टॉक्स २.२२% नी वाढून त्यांचा ६९.१५ रुपयांवर व्यापार
झाला.

अदानी
पॉवर लि.:
सर्वोच्च न्यायालयाने अदानी पॉवरला राजस्थानातून
नुकसान भरपाई वसूल करण्याची परवानगी देणा-या एपीटीईएलच्या आदेशाचे समर्थन केले. आयातीत
कोळशाची किंमत जास्त असल्याचे म्हटले. परिणामी, कंपनीच्या शेअर्समध्ये ४.३०% ची वाढ
झाली व त्यांनी ३८.८५ रुपयांवर व्यापार केला.

एस्कॉर्ट्स
लिमिटेड:
कंपनीने ऑगस्ट महिन्यात वाहन विक्रीत वाढ झाल्याची
नोंद केली. त्याच महिन्यात ट्रॅक्टर विक्रीत ८०% ची वाढ झाली. कंपनीची देशांतर्गत विक्री
७९.४% नी वाढली तर निर्यातीत ९०.४% ची वृद्धी झाली. परिणामी, कंपनीचे स्टॉक्स २.७०%
नी वाढले व त्यांनी १,११७.०० रुपयांवर व्यापार केला.

रिलायन्स
पॉवर लिमिटेड:
कंपनीने मूळ आणि व्याजाच्या रकमेत डिफॉल्ट
३००.२२ कोटी रुपयांची नोंद केल्यानंतर रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या शेअर्समध्ये २.९४%
ची घट झाली व त्यांनी ३.३० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय
रुपया:
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने काहीशी
वाढ घेत ७२.८७ रुपयांचे मूल्य कमावले.

सोने:आंतरराष्ट्रीय स्पॉट दरांत सकारात्मक गती आल्याने एमसीएख्सवर पिवळ्या धातूंच्या किंमती
वाढल्या. अमेरिकी डॉलरचा कमकुवतपणा आणि भारत-चीनमधील सीमा तणाव यामुळे एमसीएक्सवरील
सोन्याच्या किंमतींना आणखी आधार मिळाला.

जागतिक
बाजार:
अमेरिका-चीनमधील वाढता तणाव आणि डॉलरचे घटते मूल्य
यामुळे आशियाई आणि युरोपियन निर्देशांकांनी संमिश्र संकेत दर्शवले. नॅसडॅक ०.६८% नी
वाढले, एफटीएसई एमआयबी ०.६९% नी वाढले. तर हँगसेंगच्या शेअर्समध्ये ०.०३% ची वाढ झाली.
तर दुसरीकडे निक्केई २२५ आणि एफटीएसई १०० ने अनुक्रमे ०.०१% आणि १.१५% ची घट अनुभवली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!