स्थैर्य, मुंबई, २१ : बँकिंग आणि ऊर्जा स्टॉक्सच्या नेतृत्वात बेंचमार्क निर्देशांकांनी आजच्या व्यापारी सत्रात सकारात्मक कामगिरी दर्शवली. निफ्टी ०.५३% किंवा ५९.४० अंकांनी वाढला व तो ११,३०० पातळीच्या पुढे म्हणजेच ११,३७१.६० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५६% किंवा २१४.३३ अंकांनी वधारला व ३८,४३४.७२ अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एनटीपीसी (५.०९%), पॉवरग्रिड (४.६४%), एशियन पेंट्स (४.४३%), हिरो मोटोकॉर्प (२.४३%) आणि एचडीएफसी बँक (२.५२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर झी एंटरटेनमेंट (३.७१%) आणि हिंडाल्को (१.६१%), ओएनजीसी (१.१०%), भारती एअरटेल (१.२५%) आणि टाटा स्टील (०.९९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप ०.५७% आणि बीएसई स्मॉलकॅपने १.४१% ची वृद्धी दर्शवली.
जिंदाल स्टेनलेस लिमिटेड : इंडिया रेटिंग्स आणि रिसर्चने कंपनीचे रेटिंग स्थिर आउटलुकसह ८८८ रुपयांवर केल्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ८.९७% नी वाढले व त्यांनी ५१.६५ रुपयांवर व्यापार केला.
इंडियन ओव्हरसिज बँक : बँकेने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहित निव्वळ नफा १२० कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. तसेच बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न ९.६% नी वाढले. परिणामी इंडियन ओव्हरसिज बँकेचे शेअर्स २.६३% नी वाढले व त्यांनी ११.७० रुपयांवर व्यापार केला.
स्टेट बँक ऑफ इंडिया : ग्लोबल रिसर्च बँक सीएलएसएने ३१० रुपये या टार्गेट किंमतीवर खरेदीचा निर्णय कायम ठेवला. परिणामी बँकेचे शेअर्स १.७२ टक्क्यांनी वाढले व त्यांनी १९८.१० रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया :आजच्या व्यापारी सत्रात इतर जागतिक चलनांसमोर अमेरिकी डॉलरची घसरण झाल्याने भारतीय रुपयाने काहीशा नफ्याने म्हणजेच ७४.९७ रुपयांवर सुरुवात केली.
तेल : कोव्हिड-१९ साथीमुळे आर्थिक सुधारणांभोवतीच्या चिंता वाढत अशल्याने प्रमुख तेल निर्मात्यांनी उत्पन्नात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तेलाच्या किंमतीत वाढ दिसून आली.
जागतिक बाजार : वाढत्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांमुळे युरोपियन बाजारपेठेने घसरणीचा व्यापार केला. एफटीएसई १०० चे शेअर्स ०.१५% नी घसरले, एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.३४% नी घसरले. वॉलस्ट्रीटवर टेक संचलित वृद्धी दिसून आल्यानंतर आशियाई बाजाराने उच्चांकी व्यापार केला. नॅसडॅकने १.०६%, निक्केई २२५ ने ०.१७% आणि हँगसेंग कंपनीच्या शेअर्सनी १.३०% ची वृद्धी दर्शवली.