स्थैर्य, सातारा, दि.३: भारताने आज रुग्ण बरे होण्याचा 29 लाखाचा (29,01,908) टप्पा पार केला.
या आधी 22 दिवसात 10 लाख रुग्ण बरे झाल्याची नोंद होती. त्या तुलनेत गेल्या केवळ 17 दिवसांत 10 लाख रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे.
कोविड -19 च्या भारतातील व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे बरे होणाऱ्या रूग्णांचा वाढता दर. रुग्ण बरे होण्याचा निरंतर वाढणारा दर भारत कायम ठेवत असताना, बरे होणाऱ्यांची संख्या बरीच वाढली असून त्यांना रुग्णालयातून किंवा गृह विलगीकरणातून सोडण्यात आलेले आहे.
मे 2020 पासून, बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत 58 पट वाढ झाली आहे.
12 राज्य / केंद्रशासित प्रदेशांचा रुग्ण बरे होण्याचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. एकूण बरे झालेल्यांपैकी सुमारे 30% हे केवळ महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यातील आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. भारतात प्रतिदिन 60 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाल्याची सलग सहाव्या दिवशी नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 62,026 रुग्ण बरे झाले असून भारतात कोविड -19 रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण आणखी सुधारून 76.98% झाले आहे. हा आकडा सातत्याने प्रगती दर्शवित आहे.
रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या सक्रिय प्रकरणांपेक्षा 21 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दर आठवड्याला सरासरी 4 पटीने वाढले आहे.