विज वितरणच्या अभियंत्यास लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने एकच खळबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण उपविभाग फलटण येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्ग १ नंदकुमार भानुदास काळे यास २० हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी नुसार फलटण येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता या – १ नंदकुमार काळे रा. मोनिता सृष्टी अपार्टमेंट, डि.एड.चौक, फलटण ता. फलटण जि. सातारा यांना लाच स्विकारले प्रकरणी रंगेहात पपकडण्यात आले आहे. तक्रारदार यांनी घेतलेल्या इमारतीचे इलेक्ट्रीक काॅन्टॅक्टरमधील एकूण ११ नवीन मिटरचे कोटेशन तक्रारदार यांना देण्यासाठी तडजोडी अंती २० हजार रुपये लाच घेताना विद्युत भवन कार्यालय फलटण येथे पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सदरची सापळा कारवाई राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते तसेच अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे श्रीमती सुषमा चव्हाण, पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्क यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहा. फो. आनंदराव सपकाळ, पोलीस हवालदार संजय साळुंखे, पो.ना. संजय अडसुळ, प्रशांत ताटे, विनोद राजे, पो.कॉ. तुषार भोसले, निलेश वायदंडे, म.पो.कॉ. शितल सपकाळ यांनी केली आहे.

सातारा लाच लुचपत विभागाचे वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सि.स.नं ५२४ / अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदरबझार सातारा येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२१६२ / २३८१३ ९ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्सअप नंबर ७८७५३३३३३३ नंबर वर संपर्क साधावा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!