देशात नवीन कोरोनाचे रुग्ण आणखी वाढले; महाराष्ट्रात अद्याप केस नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१: भारतात नवीन कोरोना व्हायरसचा (New strain of Coronavirus) संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमध्ये बदल झाल्याचं (Mutation in Coronavirus) लक्षात आलं आणि आता हा नवा अवतार जगभर पसरत आहे. ब्रिटनमधून भारतात आलेल्या काही प्रवाशांमध्ये हा नवा विषाणू सापडला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता या नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या आपल्या देशात 29 झाली आहे.

नवा कोरोना विषाणू (New coronavirus)हा आधीपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचं सिद्ध झालं आहे. या नव्या कोरोनामुळेच ब्रिटन पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये (Lockdown)गेला. भारतात 29 जणांमध्ये या नव्या कोरोनाचा संसर्ग आढळल्याच्या वृत्ताला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. आता कुठे दैनंदिन जीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झाली असतानाच या नव्या कोरोना अवताराने दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात अद्याप कोरोनाचा हा नवा अवतार दिसला नसल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

ब्रिटनमध्ये (UK) SARS-CoV-2 चा जो नवा स्ट्रेन दिसून आला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे. पण कोरोनाव्हायरसमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे असं नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं. पण नव्या विषाणूमुळे नेमका काय परिणाम होतो हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.

NEW Covid Strain in India: ‘वेगानं पसरतोय व्हायरस, काळजी घ्या’

ब्रिटनमधून आलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या प्रत्येक प्रवाशाची विशेष तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Ministry of Health) करते आहे. आरोग्य मंत्रालयानं मागच्या काही काळात ब्रिटनमधून भारतात आलेल्या लोकांसाठी विशेष आदेश काढले आहेत. 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2020 या काळात भारतात आलेले आंतरराष्ट्रीय प्रवासी (international tourists) जर कोरोनाच्या लक्षणांनी ग्रस्त असतील आणि त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल, तर त्यांची जीनोम सिक्वेन्सिंग (genome sequencing) केलं जात आहे.

कोविशिल्ड लशीबद्दल या महत्वाच्या 9 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनमध्ये 17 बदल झाले आहेत. त्यापैकी 8 बदल खूप महत्त्वाचे आहेत. व्हायरसचा ज्या रिसेप्टरनं मानवी पेशीशी सोडला जातो तो नव्या कोरोनामध्ये अधिक मजबूत आहे, ज्यामुळे तो सहजरित्या संक्रमित होतो. संक्रमणाचा दर हा 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे हा व्हायरस इतक्या वेगानं पसरतो आहे.


Back to top button
Don`t copy text!