स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे – प्रकाश जावडेकर

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे – प्रकाश जावडेकर
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, मुंबई, दि.६: नवीन शैक्षणिक धोरण देशाच्या 21 व्या शतकातील गरजांची पूर्तता करण्याच्या दिशेने कार्य करणारे आहे. 34 वर्षानंतर बदल केलेल्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होऊन, संशोधन आणि विकासवृत्तीला चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतकमहोत्सवी वर्षातील शिक्षकदिन कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी “नवीन शैक्षणिक धोरण” या विषयावर ते आज बोलत होते.

नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे. शिक्षकांसाठी चार वर्षांचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम असेल. यात प्रत्यक्ष शिकवण्याच्या अनुभवावर भर देण्यात आला आहे.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे एकूण पटनोंदणीचे प्रमाण 10 वर्षांमध्ये दुप्पटीने वाढेल, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणामुळे पटनोंदणी वाढेल. सध्या 50 लाख ते 2 कोटी मुलं शाळेबाहेर आहेत. त्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था (NIOS), खुल्या शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येईल. आकडेमोड आणि लिहिणे-वाचणे याकडे लक्ष दिले जाणार. यामुळे सर्वांना शिकण्याची संधी मिळेल.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

 

#TeachersDay च्या निमित्ताने केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” या विषयावर आभासी माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.#OurTeachersOurHeroes pic.twitter.com/vR7pOUa2TB

— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) September 5, 2020

शिक्षण हेच सबलीकरण आहे, दुसरे काहीही नाही, असे त्यांनी यावेळी भर देऊन सांगितले. विद्यार्थ्यांना सक्षम बनवले पाहिजे. विज्ञानाची दृष्टी वाढली पाहिजे. शिक्षणाला खरा अर्थ दिला पाहिजे हे मूलभूत मुद्दे समोर ठेवून नवीन शैक्षणिक धोरणाची रचना करण्यात आली आहे. डॉ कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रागतिक शैक्षणिक धोरण तयार केले आहे. पूर्वी असणारी 10+2 शिक्षणपद्धती आता, 5+3+3+4 अशी करण्यात आली आहे. 3-8 वर्ष वयोगटातील बालकांसाठी कृतीतून शिक्षण यावर भर दिला आहे. मुलांची उत्सुकता शोधून त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करणे, याकडे लक्ष दिले जाणार आहे. दुसरीपर्यंत एक विशिष्ट अभ्यासक्रम तयार करण्याचे काम एनसीईआरटी करत आहे. यात अंगणवाडी शिक्षिका/सेविकांचे कौशल्य अद्ययावत करण्यात येणार आहे.

The #NationalEducationPolicy which has come after 34 years, will help fulfill the nation’s needs in the 21st century

The policy aims to make students capable, with education starting from age of 3 years

It will instill scientific temper and critical thinking

– @PrakashJavdekar pic.twitter.com/foArHYDdKe

— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) September 5, 2020

इयत्ता तिसरी ते पाचवी यामध्ये विषयांची ओळख असेल. यात विषय समजून घेऊन शिकण्यावर भर देण्यात आला. केवळ पाठांतर म्हणजे शिक्षण नाही. मुलांना पडलेल्या प्रश्नांचे समाधान करण्यावर भर दिला जाणार आहे. पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून द्यावे असा आग्रह आहे. यानंतर त्रिभाषा सूत्रानूसर शिक्षण देण्यात येईल.

इयत्ता सहावी ते आठवीमध्ये विषयाची ओळख आणि व्यावसायिक शिक्षणाची संधी दिली जाणार आहे. तसेच कौशल्यविकासाकडेही लक्ष पुरवले जाणार आहे.

इयत्ता नववी ते बारावीमध्ये विषयांची लवचिकता असेल. कला, वाणिज्य आणि विज्ञानशाखेचे विद्यार्थ्यांना सर्व शाखांतील विषय निवडीची मुभा असेल. या वर्गांमध्ये मोठा अभ्यासक्रम असणार नाही. मोजकाच पण उपयुक्त अभ्यासक्रम असेल. सध्या असलेल्या 3,000 अटल टिंकरींग लॅबच्या माध्यमातून शोधाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. हाच धागा पुढे नेऊन हॅकेथॉनसारखे उपक्रम आणि वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे ‘आत्मनिर्भर भारत’अभियानाला चालना मिळेल.

उच्च शिक्षणाचा पायाच मुळी संशोधन आणि नवकल्पना आहे. उच्च शिक्षण नव्या पद्धतीचे अर्थवाही शिक्षण असेल. यातून विद्यार्थ्यांची विचारक्षमता, विश्लेषणक्षमता, रोजगारक्षमता वाढेल, असे जावडेकर यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरण प्रगतीशील आहे. न्याय देणारे हे धोरण आहे. शतकानुशतके ज्या भारताचे स्वप्न पाहिले, ते साकार करण्याच्या दृष्टीने हे धोरण आहे. सर्वांनी याचे स्वागत केले आहे. शालेय शिक्षणाबरोबरच मजबूत संशोधन संस्कृतीसाठी ते महत्त्वपूर्ण आहे, असे जावडेकर म्हणाले. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गानू यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ स्नेहलता देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

भारतामध्ये कोविड-19 रूग्णांच्या बरे होण्याचा सातत्याने चढता आलेख ; गेल्या 24 तासांमध्ये सर्वोच्च विक्रम- 73,642 रूग्ण बरे होवून परतले

Next Post

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उभारणार ४० बेड्सचे “छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर”; दानशूरांना मदतीसाठी आवाहन

Next Post
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उभारणार ४० बेड्सचे “छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर”; दानशूरांना मदतीसाठी आवाहन

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उभारणार ४० बेड्सचे "छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर"; दानशूरांना मदतीसाठी आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

हे तर पवारांचे स्वत:विरूध्दच आंदोलन, भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

हे तर पवारांचे स्वत:विरूध्दच आंदोलन, भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

January 22, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

67 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्य

January 22, 2021
मे महिन्यात होऊ शकतात संघटनेच्या निवडणुका, सोनिया म्हणाल्या – ‘शेतकरी प्रश्नावर सरकारची अमानुषता आश्चर्यकारक’

मे महिन्यात होऊ शकतात संघटनेच्या निवडणुका, सोनिया म्हणाल्या – ‘शेतकरी प्रश्नावर सरकारची अमानुषता आश्चर्यकारक’

January 22, 2021
पाचबत्ती चौक परिसरातील बाणगंगा नदीवरील पुलाकडे पालिकेचे दुर्लक्ष

पाचबत्ती चौक परिसरातील बाणगंगा नदीवरील पुलाकडे पालिकेचे दुर्लक्ष

January 22, 2021
फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

January 22, 2021
जिल्हा परिषद शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

जिल्हा परिषद शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

January 22, 2021
आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

January 22, 2021
गणपतराव लोहार यांचे निधन

गणपतराव लोहार यांचे निधन

January 22, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

गर्दी करून मारहाण केल्याप्ररकणी गुन्हा दाखल 

January 22, 2021
बलात्काराच्या खोट्या गुह्यात अडकवण्याची धमकी देत एक लाखाच्या खंडणीची मागणी; पाचगणी पोलीस ठाण्यात एका युवतींसह फलटणच्या तीन जणांवर गुन्हा दाखल 

विनयभंग करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

January 22, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.