महाराष्ट्र राज्यातील गरजू बेरोजगार युवक युवतींना रोजगार संधी उपलब्ध करून देणारा ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’चा अभिनव उपक्रम
स्थैर्य, सातारा, दि. 06 : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या माध्यमातून रक्तदान शिबीर व राष्ट्रवादी ऑनलाईन नोकरी महोत्सव राष्ट्रवादी सातारा जिल्हा कार्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. तरी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांनी सातारा राष्ट्रवादी पक्ष कार्यालय येथे १० जून रोजी कार्यालयीन नोंदणी करण्यासाठी उपस्थित राहावे ( कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करत हजर राहावे) , सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करूनसुद्धा नोंदणी करू शकता.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी २१ वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेप्रमाणे यावर्षी वर्धापन दिन साजरा करताना सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. यामध्ये सातारा जिल्हा कार्यालय येथे सोशल डिस्टनसिंग चे पालन करत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सध्याच्या काळात रक्त कमी पडण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे हा उपक्रम राष्ट्रवादी च्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. दिनांक १० जून रोजी सर्व सेलचे प्रमुख, कार्यकर्ते तसेच जनतेने रक्तदान करावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे.
१० जून २०२० राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त ‘ऑनलाईन नोकरी महोत्सव’ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाल्यामुळे औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या परिस्थितीत राज्यातील युवकांनी आळस झटकून या रोजगारसंधी स्वीकारण्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजेत . कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची संधी नक्कीच मिळेल. तेव्हा या उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधी प्राप्त करून घेण्यासाठी राज्यातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी पुढे यावे असे आवाहन ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’ कडून करण्यात येत आहे.
इच्छूक बेरोजगार युवकांनी खाली दिलेल्या गुगल ड्राइव्हच्या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करावी.