मलवडीतील खुनाचा अवघ्या तीन तासात छडा; आरोपी जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मलवडी येथील अनिल नामदेव चव्हाण (वय ४२) यांच्या खुनाचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या तीन तासात उघडकीस आणून आरोपीस जेरबंद केले आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, मलवडी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील रहिवाशी असलेले अनिल नामदेव चव्हाण (वय ४२) हे प्रात:विधीसाठी शिवारात गेले असताना कोणीतरी अज्ञाताने त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना आज सकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अनिल नामदेव चव्हाण यांचा मृतदेह रताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यावरून मृत अनिल नामदेव चव्हाण यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना हा खून महिलांबाबतच्या गैरवर्तुणुकीच्या कारणावरून झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती; परंतु मयताचा सख्खा मावसभाऊ असलेला आरोपी पोपट खाशाबा मदने हा ‘तो मी नव्हेच’ या आविर्भावात घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीत वावरत होता व पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता; परंतु पोलिसांनी बघ्यांच्या गर्दीतून आरोपी पोपट खाशाबा मदने याच्या हालचाली व देहबोली चाणाक्षपणे हेरून त्यास संशयाच्या आधारे चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरूवातीला ३ तास उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करणारी माहिती सांगितली; परंतु पोलिसांनी पुराव्याच्या आधारे पोलिसी खाया दाखवताच त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने अनिल नामदेव चव्हाण याचा खून केल्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सपोनि नवनाथ रानगट, सपोनि अशोक हुलगे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित व सहकार्‍यांनी केली.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!