
स्थैर्य, फलटण, दि. 7 : फलटण नगरपालिकेने नगरपालिकेच्या शिंगणापूर रोड येथील लेडीज हॉस्टेलचे रूपांतर विलीगिकरण कक्षात केलेले आहे. गेले बरेच वर्ष लेडीज हॉस्टेल हे बंद अवस्थेत होते. फलटण तालुक्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत फलटण नगरपरिषदेने फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप व नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर रोड येथील बंद अवस्थेत असलेल्या लेडीज हॉस्टेलचे रूपांतर विलीगिकरण कक्षात केलेले आहे. त्या ठिकाणी पूर्वी हॉस्टेल असल्याच्या कारणाने तेथे संडास व बाथरूमची सोय होती परंतु बरेच वर्ष लेडीज हॉस्टेल बंद अवस्थेत असल्याने तेथील डागडुजी करून तेथे विलीगिकरण कक्षात रूपांतर करावे लागले. करोनाच्या तालुक्यातील वाढत्या रुग्णांचा विचार करता नगरपालिकेने केलेल्या कार्याचे कौतुक संपूर्ण शहरातील नागरिक करीत आहेत.