स्थैर्य, सातारा, दि.१०: सासूच्याच घरात चोरी करुन फरार झालेल्या जावई चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ७७८/२०२० भा.द.वि.सं.क .३७ ९ मधील चोरलेले सोन्याचे दागिन्यांची विक्री करण्याकरता संशयित इसम नामे राहुल खलाटे हा वाढे चौक येथे येणार असलेबाबतची खात्रीशिर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले .. त्या पथकास सदर संशयित इसमास ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या . त्या अनुषंगाने पथकाने वाढे चौक येथील पुलाखाली सापळा लावून संशयित इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता , त्याने सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं .७७८ / २०२० भा.द.वि.सं.क .३७ ९ मधील सोन्याचे दागिन्यांची चोरी तसेच सिलेंडर चोरल्याचे कबूली दिली . सदर गुन्हयांत चोरीस गेलेले ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन गॅस सिलेंडर असा एकूण २,२७,००० / – किं.चा मुद्देमाल संशयितांकडून हस्तगत करण्यात आला आहे . सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.अजय कुमार बन्सल , मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.धिरज पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक , सर्जेराव पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक , श्री.आनंदसिंग साबळे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम दबडे , पोलीस हवालदार तानाजी माने , सुधीर बनकर , संतोष पवार , पोलीस नाईक रविंद्र वाघमारे , अर्जुन शिरतोडे , अजित कर्णे , पोलीस कॉन्स्टेबल वैभव सावंत , चालक पोलीस नाईक संजय जाधव व विजय सावंत यांनी सदर कारवाईमध्ये भाग घेतला . प्रति , पोलीस अधीक्षक साताराकरिता मा.संपादक , दैनिक सातारा .