महापुरुषांच्या अवमान प्रतिबंध कायद्याची घोषणा रायगडावरून होणार

खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 5 एप्रिल 2025। सातारा। महापुरुषांच्या अस्मितेचे रक्षण करणारा आणि वादग्रस्त वक्तव्य करणार्‍याला कठोर शासन करणारा कायदा राज्य शासन व केंद्र शासनाने तत्काळ पारित करावा यासाठी खासदार उदयनराजे भोसले आग्रही आहेत. या कायद्याची येत्या 12 तारखेला रायगडावरून होणार्‍या कार्यक्रमांमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे, असा ठाम विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. तसेच केंद्र शासनाने पारित केलेला वक्फ बोर्ड कायदा हा मुस्लिम बांधवांच्या हितासाठी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले

सौराष्ट्र सोमनाथ येथे पवित्र अशा शिवलिंगाची प्रतिष्ठापना येत्या काही महिन्यात होणार आहे. या शिवलिंगाच्या काही अवशेषाचे आगमन येथील जलमंदिरमध्ये झाले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे विश्वस्त दर्शक हातीजी यांचे जलमंदिर येथे आगमन झाले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वागत करताना खा. उदयनराजे भोसले, उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली.

या दोन्ही औपचारिक भेटींमध्ये उदयनराजे यांनी उभयतांचे स्वागत केले. सोमेश्वरचे हे पवित्र शिवलिंग शनिवार, दि. 5 रोजी सायं 6 वाजेपर्यंत येथील कनिष्क मंगल कार्यालयात सातारकरांना दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले, येत्या 3 नोव्हेंबर रोजी सौराष्ट्र सोमनाथ येथे या पवित्र शिवलिंगाची पूर्ण स्वरूपात रचना केली जाणार आहे. त्या शिवलिंगाला एक वेगळे ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे या कार्यक्रमासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मूळच्या शिवलिंगाच्या काही रचना शंकराचार्य मठामध्ये संरक्षित करण्यात आल्या होत्या. त्या दृष्टीने या ऐतिहासिक रचनांचे जलमंदिर येथे आगमन झाले आहे. आजचा दिवस हा फार पवित्र आहे तसेच महापुरुषांच्या अस्मितांचे रक्षण करणारा आम्हाला अपेक्षित असणारा कठोर कायदा केंद्रशासन लवकरच पारित करेल.

याबाबतची घोषणा येत्या 12 एप्रिल रोजी रायगड येथे छत्रपती शिवरायांच्या तिथीनुसार पुण्यतिथी कार्यक्रमाच्या दिवशी होऊ शकते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये या कायद्याची घोषणा होईल छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड येथे या कायद्याची घोषणा होणे ही अत्यंत औचित्यपूर्ण बाब आहे, असे ते म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!