दैनिक स्थैर्य । दि. 08 फेब्रुवारी 2022 । फलटण । फलटण शहरामध्ये विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य फोफावले असून शहरामधील कचरा नियमितपणे उचलला जाण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. घाण व अस्वच्छतेमुळे फलटण शहरामध्ये साथीच्या रोगांचा फैलाव झाला असून डॉक्टरांच्या ओ.पी.डी. हाऊसफुल्ल सुरु आहेत. तरी फलटण नगरपरिषदेकडून संपूर्ण शहरातील साफसफाई तातडीने करुन रोगराई नियंत्रणासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
फलटण शहरामधील लक्ष्मीनगर, उमाजी नाईक चौक, श्रीराम मंदीर, जबरेश्वर मंदीर, शंकर मार्केट, बाहुली शाळा, रविवार पेठ, बारामती चौक, रविवार पेठ तालिम मंडळ परिसर, मलठण येथील स्वामी समर्थ मंदीर परिसर, संतोषी माता मंदीर रोड, काळुबाई नगर, जिंती नाका, गिरवी नाका, पृथ्वी चौक, शिवाजी नगर या ठिकाणी कचर्याचे साम्राज्य रोजचेच झाले असून नगरपालिकेकडून या परिसरात दैनंदिन स्वच्छता मोहिम राबवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.