
स्थैर्य, सातारा दि.२४: सह दुय्यम निबंधक वर्ग 2 सातारा क्र.1 व सातारा क्र.2 तसेच दुय्यम निबंधक श्रेणी 1 कराड क्र. 1 व कराड क्र.2 ही कार्यालये पक्षकारांच्या सोयीसाठी 25 व 26 डिसेंबर सुरु ठेवण्यात येणार असून कार्यालयात नियमित दस्त नोंदणी व इतर कार्यालयीन कामकाज करण्यात येणार असल्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बी.के. खांडेकर यांनी कळविले आहे.