उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर सुटला आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मिळाले यश; ग्रामस्थांनी केला सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.३: उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल ग्रामस्थांचा शासन दरबारी तब्बल २१ वर्षापासूनचा रखडलेला पुनर्वसनाचा व गावठाणाचा प्रश्न आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मार्गी लागला. हा प्रश्न सोडवल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा वेणेखोल ग्रामस्थांनी सत्कार करून आभार मानले.

उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोलच्या पुनर्वसनअंतर्गत जमीन मागणी करणाऱ्या खातेदारांचा प्रश्न तब्बल २१ वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित होता. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पुनर्वसनासाठी दिलेल्या लढ्यास यश आले असून म्हसवड येतील गावठाणामध्ये ६८ खातेदारांना कब्जेपट्टी मिळाली आहे. यामुळे वेणेखोल येथील खातेदारांचा महत्वाचा प्रश्न सुटला आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन वेणेखोल गावचे सरपंच नारायण सकपाळ, शिवराम सकपाळ, बाळकृष्ण सकपाळ , परशुराम सकपाळ, बजरंग सकपाळ ,अमोल सपकाळ ,बाळासाहेब सकपाळ व प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा सत्कार केला आणि आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!