श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मलठणच्या वारकरी भवनात मोठ्या उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२४ | फलटण | श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. यानिमित्ताने कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण येथे हा सोहळा मोठ्या आनंदाने विधीवत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला.

लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे प्रभू श्रीराम जन्मभूमी सोहळा आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता रामरक्षा हवन यज्ञ, हनुमान चालीसा, अथर्वशीर्ष पठण हे कार्यक्रम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सौ. जिजामाला नाईक निंबाळकर तसेच समशेरसिंह नाईक निंबाळकर व सौ. मनीषाताई नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर व नाईक निंबाळकर कुटुंबीय, त्याचबरोबर फलटण तालुका वारकरी संघटना, महिला आघाडी व आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष, नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी, हभप केशवराव जाधव महाराज, हभप छगनदादा निंबाळकर महाराज, माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, अ‍ॅड. नरसिंह निकम, अशोकराव भोसले, राजाभाऊ नागटीले, जयकुमार शिंदे, माजी नगरसेविका सौ. मिना नेवसे, माजी नगरसेविका सौ मदलसा कुंभार, माजी नगरसेविका सौ. विजयाताई जाधव, मोहनराव रणवरे, नाना शिंदे, मनोज कांबळे पाटील, सागर शहा, सतिश शेडगे, नितीन जगताप, सुदीप इंगळे, निखिल वायदंडे, आनंद वणवे, अजित गायकवाड, मोरे मामा, अ‍ॅड. अनिल फाळके, गजानन भगत, महिला आघाडी सौ. उषा राऊत, सौ. उर्मिला खलाटे, सौ. रणवरे, सौ. इंगोले, सौ. राहिगुडे, सौ. विजया कदम, सौ. घाडगे, सौ. निकम व मलठणकर नागरिक, महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

संध्याकाळी दीपोत्सव व दारूगोळ्याची आतिषबाजी करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!