वृक्षारोपणातून कै.वसंतराव शेंडगे यांची स्मृती जपण्याचा उपक्रम स्तुत्य : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । फलटण । वृक्षारोपण व वृक्षवाटपाच्या उपक्रमातून कै.वसंतराव शेंडगे यांच्या स्मृती जपण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फडतरवाडी (ता.फलटण) गावचे दिवंगत ज्येष्ठ नेते कै.वसंतराव शेंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शेंडगे कुटूंबियांच्यावतीने वृक्षवाटप व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह जिंती, फडतरवाडी, साखरवाडी, खुंटे आदी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी फडतरवाडीचे माजी सरपंच संतोष शेंडगे, महेंद्र शेंडगे, सुनिल शेंडगे यांच्यासह सर्व शोकाकुल शेंडगे कुटुंबियांचे सांत्वन करुन शेंडगे कुटुंबियांनी पर्यावरणपुरक उपक्रमातून वाहिलेल्या श्रद्धांजलीचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमास नितीन भोसले, शंकर माडकर, संग्रम पवार, कल्याण काटे, सरपंच जयदिप काटे, उपसरपंच अनुराज नलवडे, गोकुळ रुपनवर, गणपत धायगुडे, आबा तरंगे, तुषार नाईक निंबाळकर, डॉ.विक्रम खानविलकर, सतिश माने, समीर भोसले, उत्तमराव फडतरे, विजय फडतरे, उदय फडतरे, दशरथ फडतरे, उमेश फडतरे, चंद्रकांत रणवरे, अनिल रणवरे, शरद रणवरे, दत्तात्रय रणवरे, तुकाराम पवार, संपत माडकर, नाना माडकर, बाबुराव गायकवाड, दशरथ ईमडे, भिमराव राऊत, तानाजी माडकर, गोपाळ रुपनवर, प्रतिक शेंडगे, अक्षय शेंडगे आदींची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!