दुबई येथील डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथमच भारतीय संघाला जेतेपद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । फलटण । दुबई येथे २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथमच भारतीय संघ विदेशात सहभागी झाला होता. त्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी राहिलेल्या कॅनडाला उपांत्य फेरीत धूळ चारत भारतीय व्हॉलीबॉल संघाने अंतिम टांझानिया संघासोबत झालेल्या लढतीत दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

टांझानिया संघाचा दारुण फरभव करत भारतीय संघाने बाजी मारत व्हॉलीबॉलच्या इतिहासात प्रथम अशी गोष्ट भारतीय संघाने केली आहे आणि ही गोष्ट वाखण्याजोगी आहे. याची नोंद जगाने घेतली आहे. या भारतीय संघात फलटण तालुक्यातील सासकल गावचे सुपुत्र उत्कृष्ट नेट्मन धीरज ऊर्फ धैर्यशील दत्तात्रय दळवी यांचा समावेश होता.

या ऐतिहासिक विजयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी सासकलसह फलटण तालुक्याचे नाव मोठे केले. मॅन ऑफ द सीरिज म्हणून उत्कृष्ट शूटर बीड जिल्ह्यातील बाभूळगावचे फुलचंदराव वाघ यांची निवड करण्यात आली. या विजयात संघाचे कॅप्टन बिपीन चहल, व्हाइस कॅप्टन अंकुश पाठक, ओंकार, अंकुर, बिरज मलिक, फुलचंद शोएब बेगमपूर, धीरज दळवी, चिंतन, वासू, हेमा व शुभांगी या सर्वांचा समावेश होता. अंतिम फेरीत विजय मिळवल्यानंतर जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय असा उद्घोष करत दुबईतील भारतीय बांधवांनी जल्लोष केला.

या विजयाबद्दल विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, विशाल, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल युवा मंचचे जितेंद्र सर, दत्तात्रय डांगे, सासकल जनआंदोलन समिती, शाळा सुधार संघटन,ग् रामपंचायत सासकल, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल यांनी सर्व संघ सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सासकलसह पंचक्रोशीतील व तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी या विजयाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!