वडिलांची महती हीच आपली उन्नती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण बाप तो बापच असतो.

आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो. विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल.

बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी,ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते…तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही.

बाप असो वा वडील. तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच कमी पडत नाही.

रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो. हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही.

लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे, धगधगता अग्नी आहे. पण मावळला की सर्वत्र अंधार आहे.

म्हणूनच म्हणतो, बाप बाप असतो. आई सारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही. मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही.

ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही. आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही.

वडिलांना समोर मोठ्या आवाजात बोलू नका. त्यांच्यावर रागवू नका. त्यांचा आदर, सन्मानकरा. आई शपत कधीच तुम्हांला कळणार नाही. दुस-याचे ऐकण्यापेक्षा वडिलांचे ऐका. निश्चितच तुमच कोटकल्याण होणार. आपल्या वडिलांना मान सन्मान देऊन बघा .आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही

आपलाच बालक पालक – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!