सामाजिक एकतेचा संदेश देत शिवडी येथे इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२३ । मुंबई । विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व माहे रमजान याचे औचित्य साधून सर्वधर्मसमभावाचे उदाहरण म्हणून बौद्धजन पंचायत समिती, गट क्र. १३ अंतर्गत येणाऱ्या शाखा क्र. २१६ चे सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे जयंती उत्सव अध्यक्ष संजय कसबे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक मुस्लिम बांधव व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने शिवडी क्रॉस रोड, रेल्वे गेट नंबर ६, मुंबई येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समिती गट क्र. १३ चे विभागप्रमुख राजाभाऊ तथा रामदास गमरे, कोषाध्यक्ष प्रवीण तांबे, समाजवादी पार्टीचे नेते साजिदभाई अहमद, मारुती मंदिर विश्वस्त, सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ, महिला मंडळ, आरपीआय नेते दीपक गमरे, अनंत जाधव, राजाराम जाधव, नरेश उर्फ नाना कदम, मुस्लिम बौद्ध बांधव उपस्थित होते.

आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकीय पक्ष व त्यांचे नेते जरी धर्माचे राजकारण करत असतील तरी त्यांची खेळी यशस्वी होऊ नये म्हणून सर्व धर्मीय बांधवानी एकत्र येऊन सामाजिक सलोखा राखत सर्वधर्मसमभावाचे बीज रोवले पाहिजे त्याचकरीता सदर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे अध्यक्ष संजय कसबे यांनी आमच्या वृत्तप्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत नमूद केले. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्ते व महिला मंडळाचे आभार मानून अध्यक्ष संजय कसबे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!